जाफराबाद: आरदखेडा येथे अमृत सरोवर गाव तलावाच्या कामाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन
आज दिनांक 25 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील आरादखेडा येथे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अमृत सरोवर गाव तलावाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे यामुळे परिसरातील सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकरी बांधवांना मदत होईल. याप्रसंगी या प्रभागाचे तहसीलदार सारिका भगत यांच्यासह गावकरी शेतकरी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.