जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोरंभी परिसरात एका पट्टेदार वाघाने दर्शन दिल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रात्रीच्या सुमारास काही नागरिक चारचाकी वाहनाने गोसेखुर्द धरणाकडे जात असताना, रस्त्याच्या अगदी कडेला एका पट्टेदार वाघाचा मुक्त वावर त्यांना दिसून आला. वाघाला पाहताच पर्यटकांनी प्रसंगावधान राखून वाहन थांबवले आणि आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात या वनराजाचा रुबाबदार चालतानाचा व्हिडिओ चित्रीत केला. जंगलाच्या शांततेत वाघाचा हा राजाशाही थाट पाहून नागरिक भारावून गेले होते.