शहर पोलीस ठाणे अंतर्गत चावडी चौकात सट्टा घेणाऱ्या तरुणाला गोंदिया शहर पोलिसांनी धाड टाकून रंगेहात पकडले. सदर कारवाई दिनांक 19 डिसेंबर रोजी शुक्रवारला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. आरोपीकडून 840 रोख व सट्टा घेण्याचे साहित्य जप्त करण्यात आले .आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास सुरू आहे.