दिनांक १२ डिसेंबर रोजी स. १० वा. हिवाळी अधिवेशनात बोलताना आमदार नाना पटोले यांनी झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पातील विलंब आणि गैरकारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. ४० वर्षे उलटूनही मूळ झोपडपट्टीधारकांना घरे मिळालेली नाहीत, ही बाब खुद्द मंत्री महोदयांनी उत्तरात मान्य केली. विकासकांनी केवळ स्वतःचे टॉवर्स उभे करून जादा चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) वापरला, मात्र झोपडपट्टीधारकांना साधे घर देण्यास ते सपशेल अपयशी ठरले. यावर शासनाने त्रिसदस्यीय समितीची चौकशी करण्याचे आणि तीन महिन्यांत अहवाल.