शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत नशेत गैरवर्तन करताना अटक झालेल्या विनोद वसंत माकोडे (32) आणि सागर रामकृष्ण बोदाडे (36) यांना शिवाजीनगर कोर्टाने प्रथमच सामुदायिक सेवेची शिक्षा सुनावली. दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केल्याने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी त्यांना चार दिवस, दररोज तीन तास पोलिसांच्या