सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम शेंडा कोयलारी येथील गौतम तिरपुडे वय 56 वर्ष हे ग्राम शेंडा येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना दिनांक 21 डिसेंबर रोजी रविवारला रात्री अकरा वाजेच्या सुमारास गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे. तपास सुरू आहे.