समुद्रपूर: जाम येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी बस स्थानक परिसरातील साखळी उपोषणाला विद्यार्थ्यांसह भाजप नेत्यांनी दिला पाठिंबा
समुद्रपुर:हिंगणघाट विधानसभा श्रेत्रात मंजूर करण्यात आलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे जाम येथे होण्याच्या मागणीसाठी १२ ऑगस्ट पासून तालुका संघर्ष समितीच्या वतीने समुद्रपुर येथिल बस स्थानक परिसरात साखळी उपोषण सुरू करण्यात आले.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हातात फलक घेऊन उपोषण स्थळी भेट देऊन आपले समर्थन दिले तसेच जाम येथे शासकीय वैद्यकीय करा अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना सुध्दा विद्यार्थ्यांनी दिले आहे.सोबत तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुध्दा समर्थन दिले आहे.