कत्तलीकरिता घेऊन जाण्यासाठी कोंडून ठेवलेल्या आठ जनावरांची पोलिसांनी धाड टाकून सुटका केली. रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम चंगेरा येथील जंगलात शनिवारी (दि.२०) रात्री १०:४५ वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना चंगेरा गावालगतच्या झुडपी जंगलात जनावरांची कत्तलीसाठी साठवणूक करण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता झुडपी जंगलातील स