जालना शहरातील अंबड चौफुली परिसरातील कलावती हॉस्पीटल समोर रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी एका 30 वर्षीय तरुणाने गावठी पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास घडली असून त्यामुळे जालना शहरात खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या होती की, घातपात होता या बाबत पोलीसांनी तपास सुरु केला असून परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासले जात आहेत. दरम्यान शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आलाय.