लोकशाहीच्या या उत्सवात आज वर्धा जिल्ह्यातील पुलगावमध्ये मोठी घडामोड पाहायला मिळाली. पुलगाव नगरपालिकेच्या प्रभाग ५ आणि प्रभाग क्रमांक २ साठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, या प्रक्रियेदरम्यान प्रशासकीय वर्तुळात तेव्हा एकच खळबळ उडाली, जेव्हा राज्याच्या निवडणूक आयुक्त विजया बनकर यांनी अचानक मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. असे आज 20 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सांगण्यात आले आहे