भिवंडीच्या काल्हेर येथील एका गोडाऊन मध्ये भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. आगीची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी अग्निशमन दलाचे जवान,तीन वॉटर टँकर,अग्निशमन इंजिन,ठाणे अग्निशमन दलाचे जवान,अग्निशमन इंजिन,वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले अन तब्बल तीन ते चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.मात्र आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाले होते. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.