नांदेड-लातूर महामार्गावरील सोनखेड परिसरात कलंबर फाट्याजवळ डिव्हायडरवरती कार चढून झालेल्या भीषण अपघातात कारचा मोठा स्फोट होऊन आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज दिनांक रात्री आठच्या दरम्यान कलंबर फाट्याजवळ लातूरहून नांदेडकडे येणा-या एमएच २६ एके ६४४४ या कारने डिव्हायडरला जबरदस्त दिल्यामुळे कारचा जागीच स्फोट झाला यात चालक होरपळून गेला असून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सोनखेड पोलीस करीत आहे