दारव्हा शहरांमध्ये दिनांक ८ डिसेंबरला स्वच्छता मोहिमेसाठी सुरुवात करण्यात आली असून सायंकाळी शहरातील गोळीबार चौक येथे दारव्हा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी स्वतः सहभाग घेत स्वच्छता केली. शहरातील कुणीही आपल्या घरासमोर कचरा टाकू नये तो घंटागाडीतच टाकावा, घरासमोर कचरा फेकल्यास दीडशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे आदेश नगर परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे.