धुळे: धुळ्यातील धाडरी गावात दुर्दैवी घटना; विषारी औषध प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
Dhule, Dhule | Dec 1, 2025 धुळे तालुक्यातील धाडरी गावात ५६ वर्षीय शेतकरी प्रकाश मोतीराम पाटील यांनी कीटकनाशक औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. २६ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली असून, नातेवाईकांनी त्यांना तातडीने धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती गंभीर असल्याने २९ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. धुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.