नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला तातडीने लोकनेते दि.बा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी भूमिपुत्रांची आग्रही मागणी आहे, मात्र अद्याप पर्यंत अधिकृतरित्या दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा नामकरणाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे आज अधिवेशनादरम्यान भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली तातडीने नामकरणाची आग्रही मागणी केली आणि जर केली नाहीतर जनतेचा उद्रेक होईल आणि सरकारला भूमिपुत्रांच्या संघर्षाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.