लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला घरातून फसवून पळवून नेणाऱ्या आरोपीने तिला लोणावळा-खंडाळा परिसरात नेले आणि सुमारे तीन ते साडेतीन महिने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता ती सापडली. वैद्यकीय तपासणीत अत्याचाराची पुष्टी झाल्यानंतर तालुक्यातील बोथ येथील गोपाल हिरू राठोड (वय २६) याच्याविरुद्ध दारव्हा पोलिसांनी पोक्सोसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून लोणावळा परिसरातून अटक केली आहे.