पंचायत समिती, ता.नागपूर (ग्रामीण) येथील पाणी टंचाई आढावा सभा आज पार पडली. यामध्ये विविध गावातील सरपंच व ग्रा पं मधील पदाधिकारी यांच्या सुचनेवरून गावाला संभाव्य पाणीटंचाई होवू नये याबाबत करावयाच्या उपाययोजना बाबत माहीती जाणून टंचाई आराखड्यात समावेश करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, खंड विकास सूर्यवंशी , सरपंच गजानन रामेकर, सरपंच देवराव कडू, सरपंच गुणवंता घोरमाडे, सरपंच राजू ढेपे, सरपंच सौ दुर्गाताई भोयर, आदी उपस्थित होते.