चाळीसगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील टाकळी प्र.चा. परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील महादेव मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या वारकरी संप्रदायातील मुलांना ग्रामस्थांनी सीसीटीव्हीच्या आधारे पकडून चांगलाच चोप दिला. मात्र, मुले वारकरी संप्रदायाची असल्याने आणि त्यांचे भवितव्य विचारात घेऊन अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.