कापूस, सोयाबीन व तुरीला रास्त भाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी बीड येथे २५ डिसेंबर रोजी शेतकरी हक्क मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या जनजागृती बीड तालुक्यातील वांगी येथे रविवार दि.14 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता, शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शेतकरी व शेतकरी पुत्रांनी लोकवर्गणी करून मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.कापसाला १२ हजार, सो