नांदेड जिल्ह्यातील देगलूर–बिलोली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले जितेश अंतापूरकर यांनी आज शुक्रवारी संध्याकाळी ७.४५ वाजता भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीअंतापूरकर यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. अशोक चव्हाण, माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ. तुषार राठोड, ज्येष्ठ नेते राम पाटील रातोळीकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील आदी यावेळी उपस्थित होते.