भुसावळ: माझ्यावरती आरोप करणाऱ्या वर मी गुन्हे दाखल करणार :भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे
भुसावळकरांनी विकासाला कौल दिल्यानेच गरीब घरातील मुलीला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे मात्र काहींना पराभव सहन होत नाही, असे दिसते. जनतेला विकासकामे करण्याचे वचन आपण दिले असून कुणी आपली मुस्कूटदाबी केल्यास अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरोधात आपण थेट गुन्हा दाखल करू, असा इशारा आज दिनांक 7 जानेवारी बुधवार रोजी भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी दिला