पाटण: माजगावमध्ये बिबट्याचा कहर; पालकमंत्र्यांची तातडीची दखल, वनविभागाला पिंजरा व गस्त वाढवण्याचे आदेश
Patan, Satara | Dec 2, 2025 पाटण तालुक्यातील माजगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी होण्याची आणि दहा कोंबड्यांचा बळी गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन तत्पर झाले आहे. या घटनेची पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून मंगळवारी दुपारी साडेचार वाजता दौलतनगर, ता. पाटण येथे बैठक घेण्यात आली. बैठकीत उपस्थित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी थेट आणि कडक निर्देश देत सांगितले की, माजगाव परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ पिंजरा लावावा. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात गस्त वाढवावी.