देवळी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या सासऱ्यांना घरी नेले या शुल्लक कारणावरून एका महिलेवर दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दहेगाव धांदे येथे घडली आहे. असे आज 7 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे