14 डिसेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे तहसील हद्दीत येणाऱ्या मेयो हॉस्पिटल येथील एक्सरे विभागाच्या पार्किंग मध्ये एका पन्नास वर्षे अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला आहे याप्रकरणी प्राप्त सूचनेवरून पोलीस स्टेशन तहसील येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.