परळी: तहसील कार्यालय येथे शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेसाठी लढत राहणार - राजेभाऊ फड, उमेदवार अर्ज बंडखोरी करत केला दाखल
Parli, Beed | Oct 29, 2024 परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील युवक नेते राजेभाऊ श्रीराम फड यांनी सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदारसंघातील माता - भगीनिंची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अर्ज दाखल करतेवेळी मतदारसंघातील जनतेची मोठ्या प्रमाणावर स्वयंस्फूर्तीने उपस्थिती होती. जनतेच्या आग्रहास्तव आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असून शेवटच्या श्वासापर्यंत मी जनसेवेसाठी स्वतःला वाहून घेणार असल्याची प्रतिक्रिया युवक नेते राजेभाऊ फड यांनी व्यक्त केली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजेभाऊ