ग्राम एकोडी येथील पेट्रोल पंपाजवळ दारूच्या नशेत दुचाकी क्रमांक एमएच 35 एन 3354 वेडीवाकडी चालविताना पोलिसांनी दुचाकी चालकाला पकडले. सदर कारवाई दिनांक 9 जानेवारी रोजी शुक्रवारला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास करण्यात आली. सदर कारवाई पोलीस कर्मचारी उमेश कावळे, नागपुरे, नागदेवे यांनी केली असून गंगाझरी पोलीस ठाण्यात मोटर वाहन कायदा कलम 185 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.