बालपिर तळेगाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी अहिल्यानगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले
Beed, Beed | Nov 20, 2025 बीड शहरातील बालेपीर परिसरातून तळेगाव शीवरस्त्यावरील अतिक्रमण हटवून बीड-नगर रोड ते पठाणवाडी आणि नवीन ईदगाहपर्यंतचा रस्ता तात्काळ सुरू करावा, या मुख्य मागणीसह विविध सार्वजनिक प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन जमा मस्जिद किल्ला वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष शेख सरफराज यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. बीड-अहिल्यानगर महामार्गावर हे आंदोलन सुरू होताच नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली.