निफाड: मौजे सुकेणे येथे महानुभाव पंथीय पविते पर्व सोहळ्यास प्रारंभ, सुकेणेकर संत परिवाराची उपस्थिती
Niphad, Nashik | Aug 8, 2025 आज दिनांक 8 रोजी सायंकाळी सहा वाजेपासून मानभाव पंथी पविते पर्व सोहळ्यात प्रारंभ झाला आहे. श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने महानुभव पंथ पविते पर्व हा सोहळा साजरा केला जातो. आचार्य प्रवर मनोहरशास्त्री सुकेणेकर बाबा व सुकेणेकर संतपरिवाराने यावेळी चक्रधर स्वामी चरणांकित स्थानाला स्थान वंदन करत पविते वाहिले.