आज दिनांक 15 जानेवारी सकाळी दहा वाजता महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असून, नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडेल, असा विश्वास यावेळी पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.