अंबरनाथ: बदलापूर मध्ये निवडणूक प्रशासनाचा सावळा गोंधळ, ईव्हीएम मशीन पडली बंद
आज मतदानाच्या दिवशी बदलापूर येथून निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. होली फॅमिली इंग्लिश शाळेतील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडली असून गेल्या 20 ते 25 मिनिटांपासून मतदान प्रक्रिया बंद आहे. या संदर्भात एका उमेदवाराने आज दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास प्रतिक्रिया व्यक्त केली आहे