मुंबई: 2006 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर माजी खासदार किरीट सोमय्या यांची प्रथम प्रतिक्रिया
Mumbai, Mumbai City | Jul 21, 2025
2006 सालच्या भीषण साखळी बॉम्बस्फोट खटल्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला जो अनेकांसाठी धक्कादायक ठरला.या पार्श्वभूमीवर भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत स्पष्ट केलं की मुंबईकरांना न्याय मिळालाच पाहिजे, अतिरेक्यांना फाशी झालीच पाहिजे.त्यांनी या खटल्यात नव्याने तपास सुरू करून सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची मागणी केली आहे.मुंबईकरांची नजर आता सरकार काय निर्णय घेते यावर लागून राहिली आहे.