दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता दरवर्षीच्या परंपरे प्रमाणे यावर्षी ही स्व. वसंतराव नाईक अंध व मूकबधिर शाळा, आर्णी येथे सत्तुरवार चिल्ड्रन क्लिनिक व सोनोग्राफी सेंटर, आर्णी यांच्या वतीने इंग्रजी नववर्षाचा सण अंध व मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत डॉ. स्वप्निल वसंतराव सत्तुरवार यांनी शाळेतील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. आरोग्य तपासणीदरम्यान जंतनाशक औषधे, जीवनसत्त्