सोमवार दिनांक 29 व 30 डिसेंबरला पंचायत समिती रामटेक अंतर्गत पथरई येथे दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सोमवार दि. 29 डिसेंबरला सकाळी 11 वाजता करण्यात आले. या समारंभाचे उद्घाटन माजी उपसरपंच रोशन राऊत यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच चंद्रभान वरठी यांची उपस्थिती होती. नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पथरई अंबाझरीच्या मैदानात आयोजित कार्यक्रमाची अध्यक्षता माजी मुख्याध्यापक अशोक सातपुते यांनी केली.