भरे फाटा ते अंबडवेट रस्त्यावर रिक्षा व स्विफ्ट कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुळशीत आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी रस्त्यावरील सर्वच गतिरोधक काढल्याने तसेच कधी नव्हे तो रस्ता फार गुळगुळीत केल्याने गाड्यांचा वेग प्रचंड वाढला आहे.