कन्नड: पिकं नष्ट, कर्जाचं ओझं आणि शेवटचा निर्णय... शफेपूरच्या शेतकऱ्याची आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या!
आज दि एक नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली कि कन्नड तालुक्यातील पिशोर शफेपूर येथील शेतकरी कृष्णा रावजी दवंगे (वय ४४) यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली.दवंगे यांच्या शफेपूर शिवारातील अडीच एकर शेतात त्यांनी उसनवारी करून मक्याची लागवड केली होती. मात्र सततच्या पावसामुळे मक्याच्या कणसांना कोंब फुटले आणि संपूर्ण पीक नष्ट झाले. कर्ज फेडण्याची चिंता आणि वाया गेलेल्या खर्चामुळे ते काही दिवसांपासून चिंतेत होते.