हिंगणघाट: मोहगांव व तावी येथील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या अडचणीची आमदार कुणावार यांच्याकडून दखल: नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे पत्र
हिंगणघाट विधानसभा श्रेत्रातील मोहगांव व तावी शिवारातील ट्रान्सफॉर्मर मोठ्या प्रमाणात शेती पंपाचे कनेक्शन असल्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मर लोढ येत असल्याने वेळोवेळी विद्युत खोळंबा निर्माण होते असल्याने येथील शेतकऱ्यांची सिंचनाची गैरसोय होत आहे यासंबंधी सरपंच यांनी आमदार समिर कुणावार यांना अवगत केले असता त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीला प्राधान्य देत संबंधित विद्युत महावितरण कंपनीला पत्र देऊन या दोन्ही ठिकाणी पर्यायी अतिरिक्त दोन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे निर्देश दिले आहे.