समुद्रपूर: नागपुरातील विदर्भस्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेत गिरडचे गुरुदेव बाल सेवा मंडळाचा केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते सन्मान
नागपूर येथील खासदार सांस्कृतिक महोत्सव समितिच्या वतीने विदर्भ भव्य खंजिरी भजन स्पर्धा २०२५ चे आयोजन कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृह करण्यात आले होते.यावेळी या महोत्सवात गिरड येथील श्री गुरुदेव सेवा बाल भजन मंडल तथा अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा भजन मंडल पुरुष यांना केंद्रीय मंत्री लोकनेते नितिनजी गडकरी साहेब यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व पुरस्कार देण्यात आला याबद्दल गिरड गावात श्री गुरुदेव सेवा मंडळ गिरड येथील सर्व कलावंत दोन्ही मंडळाचे अभिनंदन करण्यासत येत आहे.