फिर्यादी अमजद खान मजीद खान यांच्या तक्रारीनुसार 8 जानेवारीला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या घराचे दार उघडून अलमारी मध्ये ठेवलेले पर्समधील 22 हजार 400 रुपये चोरून नेले. याप्रकरणी आठ जानेवारीला रात्री अंदाजे दहा वाजताच्या सुमारास पारवा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.