रेनाखळी शेत शिवारात बिबट्याने हल्ला करून दोन जनावरे ठार केल्याची घटना घडल्यानंतर या भागात वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करताना बिबट्याचे पावलांचे ठसे आढळून आल्याने तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले. या कॅमेऱ्याची रविवार 7 डिसेंबर रोजी तपासणी करताना रेनाखळी शेतशिवारात बिबट्या फिरत असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात आढळले. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकरी व नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी कोणतीही हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले.