अकोला: नो-पार्किंग, सिग्नल उल्लंघनावर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई,१०४ वाहनांवर दंड; ५६ हजारांचे चलन, ६,५०० ची त्वरित वसुली
Akola, Akola | Nov 28, 2025 अकोला : शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांना आळा घालण्यासाठी अकोला शहर वाहतूक शाखेकडून नो-पार्किंग व सिग्नल उल्लंघनाविरोधात धडक मोहीम राबविण्यात आली. पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार २७ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत तब्बल १०४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण ५६,००० रुपयांचे चलन काढण्यात आले असून त्यापैकी ६,५०० रुपयांची वसुली त्वरित करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक मनोज बहुरे यांनी दिनांक 28 नोव्हेंबर