साकोली पासून अवघ्या चार किलोमीटर मोहघाटा जंगलात सराटी ते गुढरी रस्त्याच्या दरम्यान शुक्रवार दिनांक 30 जानेवारीला सायंकाळी पाच ते सहा च्या दरम्यान वाघाने भ्रमंती केल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना आपला मार्ग बदलावा लागला आहे प्रत्यक्ष वाघाचे दर्शन झाल्याने या रस्त्यावर जाणाऱ्या प्रवासांना मात्र धडकी भरली असून वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाघ लोक वस्ती जवळ येत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे