हिंगणघाट:फुले वार्डात २५ वर्षीय तरुणावर चाकूने वार करून जखमी केले असून जख्मीला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती १ पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार जखमी संकेत कुडमथे राहणार गिरसावली तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर हल्ली मुक्काम काजी वार्ड हिंगणघाट यांने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार संकेत कुडमथे हा आठवडी बाजार हिंगणघाट येथे बाजाराकरीता पायदळ जात होतो. फुले वार्डातील नाल्याजवळ आला असता आरोप हा समोरुन आला. त्याने चाकूने वार करून संकेतला जखमी केले.