जालना शहरात अवैधपणे विक्रीसाठी आणलेल्या प्रतिबंधित गुटख्यावर चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या पथकाने कारवाई करत गुटखा व वाहनासह सुमारे 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शनिवार दि. 20 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी अवैध गुटख्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने 20 डिसेंबर 2025 रोजी चंदनझिरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी पथक नेमले होते.