नेहरु मैदान रामटेक येथे रविवार दि. 1 फेब्रुवारी ला सायं. 8 वाजता पासून सुरु झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रसिद्ध सिनेगायक सोनू निगम यांनी एकाहून एक सरस गीत प्रस्तुत करीत उपस्थित प्रेक्षक चाहत्यांना मंत्र मुग्ध केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृ तिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन नागपूरच्या संयुक्त विद्यमाने रामटेक येथे रामटेक सांस्कृ तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.