बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍडव्होकेट राहुल मखरे यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत बहुजन मुक्ती पार्टीची बारामती लोकसभे बाबतची भूमिका मांडली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी मैदानात उतरणार असल्याचं राहुल मखरे यांनी सांगितलं आहे.गावोगावी बैठका घेण्याचा मनोदय ही त्यांनी व्यक्त केला आहे.यासोबतच गावगावच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून आपली भूमिका त्यांना समजवणार असल्याचेही मखरे यांनी म्हटलं आहे.