सेलू: सेलू पोलिसांची हिंगणी, सेलू, जामणी , खापरी शिवारात वॉशआऊट मोहीम; १२ लाखांचे गावठी दारू साहित्य नष्ट
सेलू पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ५ ते ८ वाजताचे सुमारास तडाखेबाज वॉशआऊट मोहीम राबवून मौजा सेलू, हिंगणी, जामणी (बेडा) व खापरी शिवार परिसरातील गावठी मोहा दारूच्या भट्ट्या आणि अड्ड्यांवर धडक देत तब्बल बारा लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जागेवरच नष्ट केला. अवैध दारू व्यवसायावर आळा बसावा यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर केलेली ही कारवाई कौतुकास्पद ठरली आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता गुन्ह्याची नोंद घेतली आहे. असे सेलू पोलिसांकडून सांगण्यात आले.