नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तहसीलदार शेळके यांनी जालना रोडवरील वाहन तपासणी पथकाला भेट देऊन पाहणी करत सूचना केल्या
Beed, Beed | Nov 18, 2025 बीड शहरात नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाकडून सर्व स्तरांवर कडक तपासणी आणि दक्षता ठेवली जात आहे. त्याचाच भाग म्हणून बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जालना रोडवरील रिलायन्स पंपाजवळ तैनात असलेल्या स्थिर पथकाला अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी पथकाकडून होत असलेल्या वाहन तपासणीची माहिती घेतली. निवडणुकीदरम्यान अनधिकृत रोख रक्कम, दारू, प्रचार साहित्य किंवा मतदारांवर प्रभाव टाकणारे कुठलेही साहित्य वाहनेमार्फत नेले जाऊ नये, याची खात्री केली.