राज्य मार्गावरील तुमसर ते भंडारा दाभा मोड दरम बेटाळा खैरी गावाजवळ आज दि. 5 जुलै सकाळी 9:30 वा. दरम्यान नथू रघुनाथ चाचाने वय 55 रा. पालोरा ता. मोहाडी हे भंडाऱ्यावरून स्कुटी क्र. MH 36 J 1436 ने स्वताच्या गावी जात असता बेटाळा खैरी गावाजवळ अचानक हरीण आल्याने त्यांची स्कुटी अनियंत्रित झाल्याने ते स्कुटीसह रोडवर आदळले. त्यात त्यांच्या डाव्या पायाचा हाड मोडल्याने गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्य संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.