नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी काटोल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध दारू व्यवसायात सक्रिय असलेल्या दोन वेगवेगळ्या टोळ्यांतील ५ सदस्यांना १ वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.डोंगरगाव येथील दोन टोळ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यात पहिल्या टोळीतील २ आणि दुसऱ्या टोळीतील ३ अशा एकूण ५ जणांचा समावेश आहे. हे आरोपी हातभट्टीची मोहफूल गावठी दारू तयार करणे आणि तिची विक्री करण्याच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होते.