हिंगणघाट:शहरातील प्रभाग क्रमांक ९ (अ गट) तसेच प्रभाग क्रमांक ५ (अ व ब गट) साठी होणाऱ्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे.प्रभाग क्रमांक 5 मध्ये 6 मतदान केंद्रे,प्रभाग क्रमांक 9 मध्ये 5 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही प्रक्रिया निवडणूक अधिकारी व उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी व मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे